आपल्या विषयी

जालन्याच्या विकासासाठी धडपडणारे नेतृत्व भास्कर आबा दानव

आमच्या विषयी

समाज सेवा आणि विकासातील समर्पण

भास्कर आम्बा दानवे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक आहे.

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून मिळालेला राजकीय, सामाजिक कार्याचा वारसा… माता-पित्यांसह कुटुंबातील ज्येष्ठांकडून मिळालेल्या संस्काराची शिदोरी सोबत घेवून समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी धडपडणारे नेतृत्व म्हणून भाजपचे जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांची ओळख. जालना शहरासह विधानसभा मतदार संघात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून निधी खेचून आणण्यातही आबांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. गत पाच वर्षात जालना विधानसभा मतदार संघातील गाव तेथे शाखा सुरू करून संघटन मजबूत करण्यातही आबांचा वाटा मोठा राहिला आहे.

भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द या छोट्याशा गावात वाढलेले आणि मातीशी नाळ कायम असणाऱ्या भास्करआबा दानवे यांनी बीएची पदवी घेतली आहे. उच्च शिक्षण घेवून नोकरी करीत प्रगतशील शेतकरी होण्याचे स्वप्न आबांनी मनाशी बाळगले आणि त्यादृष्टीने काम सुरू केले. बीए पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्टेनोची पदवी घेतली आणि जालना नगर पालिकेत तत्कालीन नगराध्यक्ष रमेशचंद्र चौरिवशा यांच्या कार्यकाळात एक वर्षभर नोकरी केली. परंतु, नंतर ते बांधकाम व्यवसायाकडे वळले आणि एक एक कामे करीत आपली ओळख या क्षेत्रात निर्माण केली. रावसाहेब दानवे हे आमदार असल्याने अपसूकच भास्करआबा हे ही सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत होते. विशेषतः १९९९ मध्ये रावसाहेब दानवे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यामुळे आबांनी नोकरीचा राजीनामा देवून प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविला. सहकाऱ्यांना समवेत घेवून लोकसभा मतदार संघ पिंजून काढत प्रचाराची धुरा यशस्वी संभाळली आणि रावसाहेब दानवे खासदार म्हणून संसदेत गेले. रावसाहेब दानवे यांचे दिल्लीच्या राजकारणात वजन वाढत असल्याने जिल्हास्तरावर पक्ष-संघटन वाढविण्याची जबाबदारी ही भास्करआबा दानवे यांच्या खांद्यावर पडली. त्यानंतरची प्रत्येक लोकसभा निवडणूक आणि भोकरदन येथील विधानसभा निवडणुकीत प्रचाराची यशस्वी धुरा आजतागायत भास्करआबा दानवे यांनी यशस्वीरित्या संभाळली आहे. त्यांचे कार्य पाहता जालना नगर पालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. महाराष्ट्रासह दिल्लीतून येणारे पक्षाचे केंद्रीय मंत्री, वरिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांचा | जालन्यात पाहुणचार करण्याची जबाबदारी आबांकडेच आली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही त्यात सहभाग घेतला. आजवरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आबांची कामगिरी ही त्यांना सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण करून देणारी ठरली आहे. यापुढेही माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्षेत्रातून सामाजिक कार्य करीत राहणार असल्याचा मानस भास्करआबा दानवे यांनी व्यक्त केला आहे.

सामाजिक आणि आर्थिक विकासास प्रोत्साहन देणे

भासामाजिक आणि राजकीय प्रवास • आबांना सामाजिक कार्याची लहानपणापासूनच आवड निर्माण झाली होती. त्यात रावसाहेब दानवे यांचे कार्य पाहून आबांनी गावातच संघाची शाखा स्थापन केली होती. शिक्षणासाठी ते जालन्यात आले.

जालना येथेही संघाची शाखा स्थापन करून त्यांनी काम सुरू केले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत आबा राजकारणात सक्रिय झाले आणि २००४, २००१, २०१४, २०१९, २०२४ पर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये रावसाहेब दानवे (लोकसभा), संतोष दानवे (भोकरदन विधानसभा) यांच्या रावसाहेब दानवे यांच्याकडील राज्याच्या आणि दिल्लीच्या राजकारणातील व्याप वाढला होता. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत करून सामाजिक कार्याचा रथ ओढण्याची जबाबदारी भास्करआबा दानवे यांच्याकडे आली आणि त्यांनी आजवर ती लिलाय पेलली आहे.

तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करीत जालना शहरासह विधानसभा मतदार संघात कोटचवधी रूपयांची विकास कामे करण्यात आली आल्याचे भास्करआबा दानवे सांगतात. प्रत्येकवर्षी दिवाळी स्नेहमिलन हा कार्यक्रमही आबांच्या माध्यमातून आयोजित केला जातो. या कार्यक्रमालाही शहरवासियांचा प्रतिसाद मिळतो.

एक सशक्त आणि प्रगत समाज

प्रभागांकडे आजही विशेष लक्ष प्रभाग एक आणि सात मधील विविध भागात विकास कामे व्हावीत, यासाठी भास्करआबा दानवे आजही प्रयत्नशील आहेत. श्रीकृष्णनगर, शिवाजीनगर, वैभव कॉलनी, माणिकनगर, गायत्रीनगर, दत्तनगर, संभाजीनगर, सकलेचानगर, वसुंधरानगर, कोठारीनगर, ढवळेश्वर, नवीन मोंढा मागील परिसरासह प्रभाक एक आणि सात मधील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता यासह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आजवर त्यांनी काम केले आहे. प्रभागातील नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर त्या सोडविण्यासाठीही ते पुढाकार घेतात. प्रतीवर्षी दोन ते तीन हजार वृक्षलागवडीचा उपक्रमही माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आबांनी राबविला आहे. सामाजिक कार्यासाठी आजही आबा सकाळपासून रात्रीपर्यंत जवळपास १८१८ तास दैनंदिन काम करतात.

अनुभव आणि यश

यशोगाथा आणि महत्त्वाची कामगिरी

भास्कभोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द या छोट्याशा गावात वाढलेले आणि मातीशी नाळ कायम असणाऱ्या भास्करआबा दानवे यांनी बीएची पदवी घेतली आहे. उच्च शिक्षण घेवून नोकरी करीत प्रगतशील शेतकरी होण्याचे स्वप्न आबांनी मनाशी बाळगले आणि त्यादृष्टीने काम सुरू केले. बीए पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्टेनोची पदवी घेतली आणि जालना नगर पालिकेत तत्कालीन नगराध्यक्ष रमेशचंद्र चौरिवशा यांच्या कार्यकाळात एक वर्षभर नोकरी केली. परंतु, नंतर ते बांधकाम व्यवसायाकडे वळले आणि एक एक कामे करीत आपली ओळख या क्षेत्रात निर्माण केली. रावसाहेब दानवे हे आमदार असल्याने अपसूकच भास्करआबा हे ही सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत होते. विशेषतः १९९९ मध्ये रावसाहेब दानवे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यामुळे आबांनी नोकरीचा राजीनामा देवून प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविला. सहकाऱ्यांना समवेत घेवून लोकसभा मतदार संघ पिंजून काढत प्रचाराची धुरा यशस्वी संभाळली आणि रावसाहेब दानवे खासदार म्हणून संसदेत गेले. रावसाहेब दानवे यांचे दिल्लीच्या राजकारणात वजन वाढत असल्याने जिल्हास्तरावर पक्ष-संघटन वाढविण्याची जबाबदारी ही भास्करआबा दानवे यांच्या खांद्यावर पडली. त्यानंतरची प्रत्येक लोकसभा निवडणूक आणि भोकरदन येथील विधानसभा निवडणुकीत प्रचाराची यशस्वी धुरा आजतागायत भास्करआबा दानवे यांनी यशस्वीरित्या संभाळली आहे. त्यांचे कार्य पाहता जालना नगर पालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. महाराष्ट्रासह दिल्लीतून येणारे पक्षाचे केंद्रीय मंत्री, वरिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांचा | जालन्यात पाहुणचार करण्याची जबाबदारी आबांकडेच आली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही त्यात सहभाग घेतला. आजवरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आबांची कामगिरी ही त्यांना सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण करून देणारी ठरली आहे. यापुढेही माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्षेत्रातून सामाजिक कार्य करीत राहणार असल्याचा मानस भास्करआबा दानवे यांनी व्यक्त केला आहे.

कंपनीचा प्रवास

राजकीय कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे

भास्कर आम्बा दानवे यांचा राजकीय प्रवास त्यांच्या समाजातील सेवेच्या वचनबद्धतेसह सुरू झाला. त्यांनी विविध टप्प्यावर सामाजिक समस्यांची सोडवणूक केली आणि जनतेच्या हितासाठी कार्य केले. आता ते जालना जिल्ह्यातील लोकांसाठी एक प्रेरणादायी नेता बनले आहेत.

आमच्यात सामील व्हा

भास्कर आबा दानवे यांच्याबरोबर कार्य करण्याची संधी

आपल्या जालन्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आजच आमच्यात सामील व्हा आणि एकत्रितपणे एक उज्ज्वल भविष्य निर्माण करुया.

Scroll to Top